कर भऱा आणि बक्षिसे जिंका

pay tax get reward
pay tax get reward
Updated on

बिद्री : उंदरवाडी (ता. कागल) ग्रामपंचायतीने थकित करवसुलीसाठी घरफाळा, पाणीपट्टी भरा आणि भरघोस बक्षिसे जिंका! हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 31 मार्चपूर्वी कोणत्याही प्रकारची थकबाकी नसणाऱ्या ग्रामस्थांना यामध्ये सहभागी होता येणार असून लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना भरघोस बक्षिसे देणार असल्याची माहिती सरपंच भारती संजय पाटील व उपसरपंच संजीवनी दत्तात्रय पाटील यांनी दिली.

थकित घरफाळा व पाणीपट्टी ग्रामस्थांनी मार्चअखेर भरावी यासाठी सरपंच व सदस्यांनी "घरफाळा, पाणी पट्टी भरा, बक्षिसे जिंका!' ही नावीन्यपूर्ण करवसुली प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. यामध्ये मागील संपूर्ण कर 31 मार्चपूर्वी भरणाऱ्या खातेदारांमधून गुढीपाडव्यादिनी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी फ्रीज, द्वितीय क्रमांकासाठी तिजोरी, तृतीय क्रमांकासाठी तांब्याचा फिल्टर, तांब्याची घागर, टेबल फॅन, प्लास्टिक खुर्ची आदी बक्षिसे देणार असल्याची माहिती सरपंच भारती संजय पाटील, उपसरपंच संजीवनी दत्तात्रय पाटील यांनी दिली. सदस्य, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय ढेरे, ग्रामसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur illegal abortion investigation
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com