आजरा: अचानक बिबट्या समोर आल्याचे पाहून पशुपालकाने जंगलातून पळ काढला. पेरणोलीजवळील वझरे पठाराजवळच्या तळीवर शनिवारी (ता.१५) दुपारी अडीचच्या सुमाराला हा थरार घडला. म्हशी, बकरी जागीच सोडून तो गावाच्या दिशेन पळाला. .ग्रामस्थांना येऊन माहिती सांगितल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने त्याने म्हशी व बकऱ्या जंगलातून परत घरी आणल्या.याबाबत पशुपालक अक्षय कांबळे यांनी सांगितले की, वडिलांऐवजी आज मी म्हशी व बकऱ्यांचा कळप घेऊन जंगलात गेलो होतो..Kolhapur Leopard: पाठीमागून बिबट्याचा हल्ला, पण जिवावर उदार होऊन झुंजले बाळू हुंबे; ‘देवाने धरली दोरी’ म्हणत पत्नीची प्रतिक्रिया भावूक.म्हशी व बकऱ्या चरत पेरणोली गावाला सायफन पध्दतीने पाणीपुरवठा होणाऱ्या तळीजवळ आल्या. झुडपात हालचाल झाल्याने मी त्या दिशेने पाहिले. काही क्षणात थोड्याच अंतरावर बिबट्यासमोर उभा असलेला दिसला. .बकऱ्यांवर हल्ला करण्याच्या तयारीने तो समोर आल्याने माझी भीतीने गाळण उडाली. त्याच्यासमोर हातातील काठी रोखत मी जोरात आरडाओरडा केला. बिबट्याच्या भीतीने बकऱ्यांचा कळप, म्हशीही बाजूला पळाल्या. मीदेखील घाबरून पाठीमागे न पाहता जिवाच्या आकांताने गावाच्या दिशेने धूम ठोकली..Leopard Attack: जांबुत येथे पहाटे बिबट्यांच्या हल्यात महिलेचा मृत्यु.गावात आल्यावर घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. गावातील राजेंद्र सावंत व ग्रामस्थांना घेऊन परत घटनास्थळी आलो. बकऱ्यांचा कळप व म्हशींना घेऊन गावाकडे परतलो..तो पूर्ण वाढ झालेला बिबट्या असून, त्याच्या रुद्रावताराने अंगाचा थरकाप उडाला होता.’दरम्यान, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, जंगलात गुरे चारावयास व शेतात कामासाठी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.