
Raju Shetti On Elephant Issue : मागील ५०० वर्षांपासून जिनसेन मठ नांदणी यांचेकडून हत्ती पाळण्यात आले आहेत. पेटा या संस्थेने या मठाची बदनामी करण्यास सुरवात केली आहे. नांदणी मठाने या हत्तीकडून भीक गोळा करण्यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पेटा ही संस्था अंबानीची बटीक व दलाल झाली आहे. पेटा संस्थेने आजपर्यंत सर्व बेकायदेशीर व खोटे रिपोर्ट तयार करून अंबानीच्या वनतारा येथे हत्ती पाठविण्याचा कट रचला आहे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.