
Kolhapur Dairy Politics : गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी याचिका आज कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी दाखल झाली. वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी २६ ऑगस्टला होणार आहे.