अन् अशा आवळल्या खंडणीबहाद्दराच्या मुसक्‍या... 

police arrested Ransom criminal
police arrested Ransom criminal

तो सराफ पेढी बंद करून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा गावात येत होता. त्याच्याकडील बॅगेत सुमारे वीस लाख रुपयांचे सोने आणि रोकड असते हे त्याला माहिती होते. गावात आरोपीने रेकी केली. दुसऱ्याच दिवशी लुटण्याच्या उद्देशाने सराफावर गोळीबार केला. आरोपींनी बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दरम्यानच्या काळात तेथून एक मोटार गेली. त्यामुळे आरोपी पळून गेले. मुलाने बॅग सोडली नव्हती त्यामुळे आरोपींच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यावेळी त्या बॅगेत केवळ सात हजार रुपये आणि सुमारे दहा हजार रुपयांचे सोने होते. पुढे तपास सुरू झाला. हुपरी पोलिस ठाणाच्या तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी परिसरात बारकाईने तपास केला आणि तीन आठवड्यात सांगली जिल्ह्यातील खंडेराजोरी येथून मध्यरात्री दोन वाजता आरोपीला अटक केली. आरोपीवर वीसहून अधिक खंडणीचे गुन्हे दाखल होते. 

हे पण वाचा -  Video धक्कादायक ; तंबाखू खाऊन शिक्षक देतो विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या; शिक्षकाविरोधात प्राध्यापिकेचे आंदोलन

चंदेरी दुनिया म्हणून ओळखली जाणाऱ्या हुपरीमध्ये अनेक चांदी व्यावसायिक आहेत. असाच एक चांदी-सोन्याचा व्यवसाय करणारा सराफ होता. त्याने कर्नाटक सिमाभागातील सदलगा येथे पेढी काढली. तो आणि त्याचा मुलगा रोज मोटारसायकलीवरून तेथे जात होता. सायंकाळी साडेसात वाजता पेढी बंद करून परत येत होता. यावेळी त्यांच्या हातात बॅग असायची. या बॅगेत तो पेढी बंद केल्यानंतर सर्व सोने-चांदी आणि रोकड घेवून येतो अशी माहिती आरोपींना मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी गावात रेकी केली होती. जानेवारी 2019 मध्ये त्यांनी सराफाला आडवाटेला गाठले आणि लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर थेट गोळीबार केला. यावेळी सराफाच्या हातातील बॅग मुलाने सोडली नाही. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या आरोपींच्या जवळून मोटार गेली आणि आरोपी तेथून पळून गेले. 

घटनेनंतर तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि सध्याच्या वडाळा (मुंबई) येथील पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी त्यांच्या टीम सोबत जावून पंचनामा केला. माहिती घेतली तेंव्हा त्यांना आरोपी स्पोर्टस्‌ बाईक वरून आले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तपासाला वेग घेतला. परिसरातील सीसीटीव्ही पाहिले तेंव्हा आरोपी स्पोर्टस्‌ बाईकवरून आल्याची खात्री झाली. आरोपी आणि बाईकचा शोध सुरू केला. काही दिवसांतच त्यांना एका शेताजवळ अज्ञात म्हणून पडलेली स्पोर्टस बाईक मिळून आली. त्या बाईकच्या चेस क्रमांकावरून मालकाचा शोध सुरू केला. तेंव्हा इस्लामपूर(जि.सांगली) मध्ये ही बाईक असल्याचे स्पष्ट झाले. तेथेही बाईक चोरीस गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात होती. त्यावरून मालकाचा शोध घेतला. सांगली जिल्ह्यातील बाईक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आरोपी असावा असा अंदाज नदाफ यांनी केला. सांगली शहरातील पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे जाऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली. तेंव्हा हा प्रकार रुपनर या आरोपीकडून झाल्याचा संशय व्यक्त झाला. त्याचा फोटोही मिळाला. पोलिसांनी त्या फोटोच्या आधारे सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. तेंव्हा तोच आरोपी असल्याची जवळजवळ खात्री झाली. त्यामुळे पोलिसांना आरोपी निश्‍चित करण्यात यश आले होते. त्याला पकडण्याची मोठी जबाबदारी होती. 

आरोपी खंडेराजोरीजवळील डोंगराच्या पलिकडे राहत होता. त्यामुळे त्याच्या घराकडे कोणी येत असल्याची माहिती त्याला सुमारे दीड किलोमीटरवरूनच मिळत होती. मोटारीचा आवाज जरी आला तरी तो सतर्क असायचा. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री एक-दीडच्या सुमारास डोंगरावरून चालत जाण्याचा मार्ग स्विकारला. त्याच्याकडे बंदूका आणि जीवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना पूर्वीच मिळाली होती. त्यामुळे त्याच्यासमोर जाणे धाडसाचे होते. तो पोलिसांवर गोळीबार करून पळून जाऊ शकत होता. त्यामुळेच मध्यरात्री तो गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या घराला वेढा घातला आणि त्याला रात्री दोन वाजता अटक केली. त्याला हुपरीत आणले. तेथे त्याच्या गुंडगिरीची माहिती पोलिसांनी घेतली. तेंव्हा त्याच्यावर वीस पेक्षा अधिक खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. दोन पिस्तुल आणि 40 जीवंत काडतुसे त्याकडे होती. त्याचा सर्व आढावा घेवून नदाफ यांनी थेट मोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आणि अखेर त्याला मोका लागला. त्यामुळे खंडणीबहाद्दलाला अटक तर झालीच पण मोका मिळाल्यामुळे त्याच्या पुढील गुन्हेगारीला सुद्धा चाप बसला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com