शहापूरात लॉजिंगवर पोलीसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
sakal

शहापूरात लॉजिंगवर पोलीसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

शहापूर येथे हॉटेल आरव अँड लॉजिंगवर छापा टाकून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला

इचलकरंजी : शहापूर येथे हॉटेल आरव अँड लॉजिंगवर छापा टाकून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एजंटासह महिलांची वाहतूक करणारा तसेच लॉजच्या व्यवस्थापक, रूमबॉयला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.त्यांच्याकडून 25 हजार 701 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.दरम्यान या छाप्यात इचलकरंजीमधील दोन राजकीय जोडपी आढळून आल्याने समज देवून सोडून दिले.मात्र या कारवाईने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले.

शहापूरात लॉजिंगवर पोलीसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,शहापूर ते पंचगंगा कारखाना मार्गावरील हॉटेल आरव ॲण्ड लॉजिंगमध्ये बेकायदेशिरपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसाना मिळाली. शुक्रवारी दुपारी या लॉजवर छापा टाकला असता अश्लिल चाळे करीत असलेले शहरातील दोन राजकीय जोडप्यास दोन युवक आणि दोन पिडीत युवती आढळून आल्या. पोलिसांच्या या कारवाईची माहिती समजताच एका राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हॉटेलच्या परिसरात गर्दी केली होती. अखेर राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलिसांनी या जोडप्याना समज देवून सोडून दिले.

शहापूरात लॉजिंगवर पोलीसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
निवडणूक निकाल आणि अर्थशास्त्राची फारकत...

यापक्ररणी एजंट नज्ञानेश्वर शंकर सावंत (वय ३२ रा. अमोल बेकरी जवळ, कोरोची, मदत करणारा तसेच महिलांना ने-आण करणारा (वाहतुकदार) शरद महादेव पाटील (वय३३ रा.तिसंगी, ता-गगनबावडा),लॉजचे व्यवस्थापक दिपक कृष्णा म्हेत्तर (वय ३२ रा. आसळज, ता गगनबावडा) तसेच रुम बॉय भारत आबासो दबडे( वय ३९ रा. सोनंद, ता-सांगोला, जिल्हा सोलापुर ) या चौघांना करून शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परराज्य कनेक्शन उघड

लॉजच्या व्यवस्थापकाशी हातमिळवणी करून वाहतूकदार परराज्यातील महिलांना वेश्याव्यवसायासाठी शहरात पुरवत असल्याचे कारवाईत स्पष्ट झाले. शहराबाहेरील काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या लॉजजमध्ये हा गंभीर पक्रार उघडकीस आला आहे. वेश्याव्यवसायासाठी महिलांच्या परराज्यातील वाहतुकीबाबत खोलवर तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com