esakal | कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीत लॉजवर जुगार अड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

Police red on lodging Gambler in kolhapur

लक्ष्मीपुरीतील प्रफुल्ल लॉजवर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक व्यवस्थापक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल केला. कारवाईत 48 हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीत लॉजवर जुगार अड्डा

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीतील प्रफुल्ल लॉजवर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक व्यवस्थापक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल केला. कारवाईत 48 हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : मुझफर साहेबजी मुल्ला (गोकुळ शिरगाव), विनायक जयसिंग खाडे, मिलिंद अनिल मुदगल, प्रकाश महादेव जाधव (यादव नगर), नियाज सय्यदअली काझी (शाहू मैदान परिसर), संजय भीमराव पोवार (शास्त्रीनगर), फारुख अल्लाबक्ष मोमीन (यादवनगर), प्रमोद अशोक जगताप (मंगळवार पेठ), अमर कांबळे (यादव नगर), लॉज व्यवस्थापक विशाल आनंदा जाधव (हातकलंगले), लॉज मालक पराग प्रतिनाथ डुणुंग (लक्ष्मीपुरी) अशी आहेत.

हे पण वाचा - 'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार' 
पोलिसांनी दिलेली माहिती, लक्ष्मीपुरी येथील प्रफुल्ल लॉजमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल सायंकाळी लॉजवर छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 18 हजार 660 रुपये रोकड, 6 मोबाईल असा एकूण 48 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळण्याला एकत्रित आणणाऱ्या संशयित अमर कांबळेसह लॉज मालकासह व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल केला. तपास हेडकॉन्स्टेबल नामदेव पाटील करीत आहेत.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top