
Kolhapur SP Office :‘पोलिस मुख्यालयात ‘राजाची’ मक्तेदारी कायम’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल थेट पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घेतली आहे. रजा, सुटी, बंदोबस्त अशांसह क्रीडा स्पर्धेतही मलिदा मिळविण्याचा प्रयत्न झाला होता. याच चौकशीदरम्यान ‘राजा’ची वरात मुख्यालयाच्या भोवतीच सहा वर्षांपासून फिरत असल्याचे समोर आले आहे. अधीक्षकांनी आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचीही झाडाझडती घेत येथील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.