
Kolhapur Poitics Mahayuti : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ६८ गटांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला. दरम्यान, महाविकास आघाडीसह महायुतीकडून या प्रत्येक गटात निवडणूक लढविणासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. मात्र, सत्तेत असणाऱ्या महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या असल्याने कोणाला - कोणत्या गटात उमेदवारी द्यायची, हा मोठा पेच महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे.