
-संभाजी गंडमाळे
कोल्हापूर : गणेशोत्सव तीन महिन्यांवर आला असून, येथील विविध मूर्तिकारांकडे किमान पन्नास टक्क्यांहून अधिक मूर्तिकाम पूर्ण झाले आहे. घरगुती मूर्तींबरोबरच मंडळांसाठीच्या मोठ्या मूर्तींच्या कामालाही हळूहळू गती आली आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवरील निर्बंधाची टांगती तलवार अजूनही कायम आहे.