
Postal Ballot Counting
esakal
मोजणीची नवीन वेळापत्रक – आता टपाल मतपत्रिकांची मोजणी ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या) शेवटून दुसऱ्या फेरीत होईल; याआधी ही मोजणी ईव्हीएम मोजणी सुरू होण्याआधी होत असे.
कारण – टपाल मतांची वाढ – दिव्यांग व ८५+ मतदारांना घरबसल्या मतदानाची सोय झाल्यामुळे टपाल मतपत्रिकांची संख्या वाढली असून, प्रक्रियेत सुसंगती व पारदर्शकतेसाठी हा बदल केला आहे.
जबाबदारी अधिकाऱ्याची – मोठ्या संख्येतील टपाल मतपत्रिकांची मोजणी वेळेत पार पाडण्यासाठी पुरेसे टेबल व मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी मतमोजणी अधिकाऱ्यावर सोपवली आहे.
Election Ballot Counting : मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट होण्यासाठी यापुढे टपाली मतपत्रिकांची मोजणी इलेक्ट्रॉनिक यंत्रातील मोजणीच्या शेवटून दुसऱ्या फेरीत करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यापूर्वी ही मते यंत्रातील मोजणी सुरू होण्यापूर्वी होत होती.