
कोल्हापूर : ‘मेड इन इंडिया-कोल्हापुरी’ ब्रॅण्डने कोल्हापुरी चप्पलसह अन्य हस्तकला उत्पादने तयार करण्याचा मानस आज ‘प्राडा’च्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीत व्यक्त केला. तसेच कोल्हापुरी चप्पल नेमके कसे बनते, हे पाहण्यासाठीही प्राडा ग्रुपचे तांत्रिक विभागाचे पथक इटलीहून कोल्हापुरात येणार आहे. साधारण १५ किंवा १६ जुलैला ते महाराष्ट्रात येईल, असेही सांगण्यात आले.