इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी प्रशांत कोरटकर याला अखेर कोल्हापूर सत्र न्यायालायनं जामीन मंजूर केला. .Rafale Deal Again: राफेल पुन्हा चर्चेत! फ्रान्सकडून भारत घेणार नवी २६ जेट विमानं; 63,000 कोटींची झाली डील .तुरुंगातून होणार सुटकाकोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकरचा जामीन मंजूर केला. त्यामुळं सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका होणार आहे..GDP Calculation: 'भारत जीडीपीबाबत खोटं बोलतोय', ईमेलचा शोध लावणारा करतोय मोदी सरकारवर टीका.असीम सरोदे काय म्हणाले?कोरटकरच्या जामीनावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे म्हणाले, "प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर झाला आहे. पण कोर्टाच्या या निर्णयावर मला नाराजी व्यक्त करावीशी वाटते. याप्रकरणाचा अद्याप तपास पूर्ण झालेला नाही हे पोलिसांकडून आणि सरकारी वकिलांकडून कोर्टाला वारंवार सांगण्यात आलं. कोरटकर जेव्हा पळून गेला तसंच त्याला लपवण्यासाठी कोणी कोणी मदत केली? याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नव्हती" .Prashant Koratkar : शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; कळंबा कारागृहातील मुक्काम वाढणार....तर जामीन होणार रद्दकाही अटीशर्तींवर कोर्टानं प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं दिलेल्या अटी शर्तींचं पालन त्यानं केलं पाहिजे, अन्यथा एक जरी अट त्यानं पाळली नाही तर त्याचा जामीन रद्द होऊ शकतो, अशी माहितीही यावेळी अॅड. सरोदे यांनी दिली. .Prashant Koratkar : कोरटकरने वापरलेली आणखी एक मोटार नागपुरातून ताब्यात; नोटिसा पाठविलेले काहीजण हजर होण्याची शक्यता.कोर्टात नेमकं काय घडलं?सुनावणीदरम्यान, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी यांनी कोर्टरकरला जामीन मंजूर केला. केवळ तांत्रिक बाबींचा विचार करुन कोर्टानं कोरटकरला जामीन मंजूर केला आहे. यामध्ये कोणत्या कलमांखाली कोरटकरला अटक झाली. तसंच या कलमासाठी किती शिक्षा आहे? या सर्वांचा विचार करुन कोर्टानं त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अॅड असीम सरोदे यांनी दिली. जामीन देताना कोरटकरला कोर्टानं ५०,००० रुपयांच्या जातमुचलका भरावा लागणार आहे. तसंच पोलीस चौकशीसाठी त्याला जेव्हा बोलावतील तेव्हा त्याला पोलिसांसमोर हजर व्हावं लागेल, या महत्वाच्या अटी यावेळी कार्टानं घातल्या आहेत. .Google Map : गुगल मॅपवर विश्वास ठेवून चालवली गाडी, थेट रेल्वे ट्रॅकवर पोहोचला; समोरून आली मालगाडी.कोरटकर दोन दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार?दरम्यान, कळंबा येथील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर हालचाली वाढल्या आहेत. कारागृहाबाहेर पोलीस कर्मचारी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पण कोरटकर आज बाहेर पडणार का उद्या सकाळी? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजून दोन दिवस तरी कोरटकरची तुरुंगातून सुटका होत नाही. कारण जामिनची प्रक्रिया ज्या कोर्टत करायला लागेल ते कोर्ट रजेवर आहे, उद्या सुट्टी आहे त्यामुळं हे काम शुक्रवारी चालेल त्यानंतर कोरटकर तुरुंगातून बाहेर येईल असं सांगितलं जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.