
Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह शब्द वापरणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला ११ तारखेपर्यंत दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपली. त्यामुळं कोल्हापुरातील सत्र न्यायालयात यावर आज सुनावणी पार पडली. कोरटकरला अटक होणार की, जामीन मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
पण कोर्टानं आज कोरटकरला कुठलाच दिलासा दिला नाही, उद्या यावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. पण कोरटकरचा मोबाईल यावेळी कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात सादर केला. या मोबाईलमध्ये नेमकं काय आढळलं याबाबत पोलिसांनी कोर्टाला माहिती देखील दिली.