कोल्हापूरच्या पोलिस पथकाने कोरटकरला तेलंगणामधील मंचरियाल येथून पकडले. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने करत प्रशांत कोरटकरने (Prashant Koratkar) इतिहास संशोधक इंद्रजित यांना फोन करून धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी नागपूरला रवाना झाले होते. मात्र, कोरटकर सापडला नव्हता. यानंतर त्याने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे दाखल केलेला अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने तो पोलिसांपासून (Kolhapur Police) बचाव करत होता.