पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याला झोडपले

शहरातील जनजीवन विस्कळीत
Rain Hit In kolhapur
Rain Hit In kolhapurSakal

कोल्हापूर - मॉन्सूनपूर्व पावसाने सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. दुधाळी परिसरातील केएमसी कॉलेजजवळ झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

शहरासह जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास काही प्रमाणात हलक्या सरी उपनगरात झाल्या; मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या मेघगर्जनेसह पावसाने अर्ध्या तासातच जनजीवन विस्कळीत केले. कार्यालये सुटण्याच्या वेळीच पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांना थांबून राहावे लागते. जोरदार वाऱ्यामुळे वाहतूकही खोळंबली. दुधाळी परिसरातील केएमसी कॉलेज परिसरात मोठे झाड रस्त्यावर पडले. विजेच्या तारा तुटल्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडित झाला.

नागरिकांना, वाहनधारकांना धोका नको म्हणून तेथे विशेष खबरदारी घेण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, पावसामुळे अनेकांनी पेट्रोलपंपासह मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. सुमारे दीड तासाहून अधिक काळ पाऊस पडतच होता. छत्रपती शाहू मिलमध्ये काही ठिकाणी झाडे पडली. शहरात इतर ठिकाणी मात्र कोणतीही हानी झाली नाही. मध्यवर्ती बसस्थानक आणि महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचीही त्रेधा उडाली. अनेकांनी रस्त्यावरील साहित्यासह काढता पाय घेतला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील प्रवाशांची आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची धावपळ उडाली.

आजही पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उद्या (ता. १९) ही कोल्हापुरात पाऊस असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे उद्याही शहरासह जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com