कोल्‍हापूर : दुर्गम भाग वगळून पदोन्नती द्या; शिक्षक संघटनांची मागणी

सदस्यांनी केला विरोध; विज्ञान शिक्षक रिक्त पदे
Teachers union
Teachers unionsakal

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील विज्ञान शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने रिक्‍त आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या सबबीवर शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांना पदोन्नती प्रक्रिया राबवण्यास भाग पाडले. मात्र प्रत्यक्ष पदोन्नतीवेळी शाहूवाडी व चंदगड या दुर्गम भागातील शाळांवर पदोन्नती घेण्यास अनेक शिक्षकांनी नकार दिला. यामुळे अनेक पदे रिक्‍त आहेत. आता दुर्गम भागातील व तक्रारी असलेल्या शाहूवाडी व चंदगड तालुक्यांना वगळून इतर तालुक्यात पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली आहे. आज शिष्‍टमंडळाने चव्‍हाण यांच्याकडे तात्‍काळ पदोन्नतीची मागणी रेटून धरली. दरम्यान सदस्यांना ही माहिती समजताच त्यांनी या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेण्याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पदोन्नतीचे हे प्रकरण गाजणार आहे.

विज्ञान शिक्षकांना पदोन्नतीसाठी सतत पाठपुरावा व दबाव तंत्राचा वापरही केला. त्यामुळे पदोन्नतीसाठी १२०० शिक्षकांना बोलावले. मात्र चंदगड व शाहूवाडी तालुक्यात जाण्यास शिक्षक तयार होत नसल्याने अनेक जागा रिक्‍त राहिल्या. त्यामुळे या जागा भरल्यानंतरच इतर ठिकाणची पदोन्नती दिली जाईल, अशी भूमिका श्री.चव्‍हाण यांनी घेतली. वेगवेगळ्या माध्यमातून पदोन्नतीचे आदेश द्यावेत यासाठी संघटना प्रयत्‍न करत आहेत. मात्र श्री. चव्‍हाण यांनी त्यास दाद दिलेली नाही. आज सर्वच संघटनांचे पदाधिकारी काही लोकप्रतिनिधींना घेऊन सीईओंना भेटले. यावेळी त्यांनी शाहूवाडी, चंदगड वगळून इतर तालुक्यातील शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश देण्याची मागणी केली; मात्र असे करण्यास व्‍हाण यांनी विरोध करत बैठक घेण्याची ग्‍वाही दिली.

दरम्यान शिक्षक पदोन्‍नतीबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती सदस्यांना समजली. या सदस्यांनी तात्‍काळ बैठक घेत विज्ञान शिक्षक पदोन्‍नतीवर जिल्‍हा परिषद सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची मागणी केली. त्याबाबतचे पत्र विजय भोजे यांनी दिले. या पत्रावर सदस्य विजय बोरगे, सर्जेराव पाटील पेरीडकर, महेश चौगले, प्रसाद खोबरे यांच्यासह २० पेक्षा अधिक सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत. सर्वसाधारण सभा ९ तारखेला होणार असून या सभेत पदोन्‍नतीवर खडाजंगी चर्चा होण्याची चिन्‍हे आहेत.

आमदारांचे पत्र बदलून देतो

पदोन्नतीबाबत आमदार प्रकाश आबीटकर यांनी सूचना केल्या आहेत. मात्र त्यांच्या सूचनांच्या उलट आपली मागणी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी सांगितले. त्यांच्या सूचनांनुसार निवेदन नसल्याचे त्यांनी स्‍पष्‍ट केले. यावर पटकन एका शिक्षक नेत्याने, आमदारांचे पत्र बदलून देतो त्यानुसार कारवाई करा, असा सल्‍ला देताच उपस्‍थित शिक्षक व अधिकारीही अवाक झाले.

ज्यांना ज्यांना विषय शिक्षक व्‍हायचे आहे, त्यांनी विषय शिक्षक व्‍हावे त्या त्या तालुक्यात वर्गोन्नती स्वीकारली तर कोणाची गैरसोयही होणार नाही. सर्वच्या सर्व रिक्‍त जागा यामुळे भरल्या जातील. यामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याबाबतचा निर्णय आता शिक्षक संघटना व संबंधित शिक्षकांनी घ्यायचा आहे.

- संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com