esakal | 'भाजपनं घाणेरडं राजकारण थांबवलं नाही, तर कोल्हापुरी पद्धतीनं सत्कार'
sakal

बोलून बातमी शोधा

'भाजपनं घाणेरडं राजकारण थांबवलं नाही, तर कोल्हापुरी पद्धतीनं सत्कार'

मार्केट यार्डातील पक्ष कार्यालयात सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

'भाजपनं घाणेरडं राजकारण थांबवलं नाही, तर कोल्हापुरी पद्धतीनं सत्कार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. मार्केट यार्डातील पक्ष कार्यालयात सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले, तर युवक राष्ट्रवादीच्यावतीने दसरा चौकात सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

मार्केड यार्ड येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भैय्या माने म्हणाले, 'मंत्री मुश्रीफ हे गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधात त्यांनी नेहमीच रोख-ठोक आवाज उठवला आहे. त्यांचा हा स्वाभिमानी आवाज दाबण्यासाठीच हे सगळे षडयंत्र आहे. भाजपने ही असली कट-कारस्थाने आता थांबवावी. अन्यथा, रस्त्यावर उतरून उत्तर द्यावे लागेल.’

हेही वाचा: जिल्हा बॅंकेची रणधुमाळी दिवाळीत?

जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची स्वाभिमानी नगरी आहे. इथे खोटारड्या व घाणेरड्या राजकारणाला थारा नाही. भाजपने असले घाणेरडे राजकारण थांबवले नाही तर कोल्हापुरी पद्धतीने पट्ट्यात घेऊन त्यांचा सत्कार करू.’ यावेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, वक्ता सेलचे जिल्हाप्रमुख रामराव इंगळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरे यांचीही मनोगते झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, दत्ताजीराव हजारे, रामराव इंगळे, रोहित पाटील, विकास पाटील, यासीन मुजावर, आप्पासाहेब धनवडे आदि उपस्थित होते.

हेही वाचा: 'राणे, राऊत नाहक वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करताहेत'

मंत्री हसन मुश्रीफ व प्रदेश युवक उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. मुश्रीफांवर केलेले आरोप सहन करणार नाही, असा इशारा कोल्हापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी दसरा चौक येथे केलेल्या आंदोलना दरम्यान दिला. यावेळी विध्यार्थी शहराध्यक्ष प्रसाद उगवे, सौरभ पवार, कैलास कांबळे, विग्नेश आरते, शांतिजीत कदम, मखदूम नाईकवडी, जैद शेख आदि उपस्थित होते.

loading image
go to top