

Raju Shetti Protest Pune Bangalore Highway Closed kognoli toll naka
esakal
Pune Bengaluru Highway Blockade : साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा आणि गळीत हंगाम लवकर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी (ता. १३) सकाळी अकरापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेसह प्रमुख महामार्गांवर आंदोलन सुरू करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले असून, येथे शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. हत्तरकी टोलनाक्यावरही हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.