

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एका ४७ वर्षांच्या विवाहित माणसाने कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
esakal
Pune Kolhapur Crime News : देवदर्शनावेळी झालेल्या परिचयातून एका महिलेने एकाशी ओळख वाढविली. त्यानंतर त्या व्यक्तीला भाऊ मानत असल्याचा दिखावा करत त्याला काशी विश्वनाथला नेले. तेथे त्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले व त्यानंतर त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत, तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.