

Pune–Kolhapur Highway
esakal
Pune-Kolhapur Highway News : पुणे-कोल्हापूर या महत्त्वाच्या महामार्गाचा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे आज केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले. कोल्हापूर-पुणे रस्त्याच्या प्रकल्पाला विलंब झाला असून, तो कधी पूर्ण होईल, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुणे ते सातारा या रस्त्याचे काम आधी रिलायन्सकडे होते. ते काढून आता दुसऱ्या कंत्राटदाराला दिले असून, त्यावर आम्ही नव्याने अध्ययन करीत आहोत.