

जयसिंगपुरात पिसाळलेल्या कुत्र्याने ५ जणांना चावले; उपचारादरम्यान महिलेचा रेबीजने मृत्यू. ७ वर्षांची मुलगी गंभीर जखमी
esakal
Kolhapur Dog Attack : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचा आज रेबीजने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेखा सुभाषचंद्र गांधी (वय ७१, रा. रेल्वे स्टेशन, जयसिंगपूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर २९ ऑक्टोबरला पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. आता मृत्यूमुळे पालिका प्रशासनाविरोधात शहरात संताप व्यक्त केला जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.