राधानगरी धरणाचा "ड्रीप' योजनेत समावेश वक्राकार दरवाजे योजनेला प्राध्यान्य मिळणे शक्‍य

 Radhanagari dam included in "drip" scheme
Radhanagari dam included in "drip" scheme
Updated on

राधानगरी ः धरणाची सुरक्षा व्यवस्था मजबुतीकरण आणि सुधारणेसाठीच्या "ड्रीप' योजनेत राधानगरी धरणाचा समावेश झाला आहे. योजनेत समावेश होणारे हे जिल्ह्यातील पहिलेच धरण आहे. यातून धरणाच्या सांडवा पुनर्बांधणीच्या (वक्राकार दरवाजे) प्रस्तावित योजनेला प्राधान्य मिळण्याचे संकेत जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिले. 
पूरनियंत्रण आणि धरण सुरक्षेसाठीच्या प्रस्तावित वक्राकार दरवाजांची योजना चार दशकांपासून केवळ चर्चेत राहिली आहे. स्थळ पाहणी आणि अभ्यास या मर्यादेतच प्रस्तावित योजना राहिली. योजना निश्‍चिती व आराखडा तयार झालेला नाही. स्वयंचलित दरवाजांच्या ठिकाणी वक्राकार दरवाजे हा पर्याय मागे पडला असून, अन्य पर्यायांचा अभ्यास होऊन अहवाल धरण सुरक्षा संघटनेकडे या आधीच पाठविण्यात आला आहे. तरीही "मेरी'कडून प्रस्तावित योजनेच्या आराखड्याची डिझाईन कार्यवाही अद्याप झालेली नाही. आता "ड्रीप' योजनेतील समावेशामुळे प्रत्यक्ष कार्यवाहीची शक्‍यता बळावली आहे. 
शासनाने राज्यातील प्रमुख नऊ धरणांची पाहणी करून सुरक्षा सुधारणा व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने जानेवारी 2020 मध्ये राधानगरी धरणाची पाहणी केली. त्या वेळी सांडवा पुनर्बांधणी योजनेचा आराखडा "मेरी'कडून तयार करून घेण्याचे सूचित करण्यात आले. त्यानंतर जागतिक बॅंकेच्या पथकानेही या धरणाची पाहणी करून धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधी आपत्कालीन दरवाजे तत्काळ सुरू करता येतील, अशी व्यवस्था निर्माण करण्याची सूचना दिली. वडनेरे समितीनेही पूर नियंत्रणासाठी वक्राकार दरवाजांच्या योजनेवर अहवालात भर दिला आहे. यामुळे पूरनियंत्रण व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने वक्राकार दरवाजे यांच्या प्रस्तावित योजनेचे महत्त्व अधोरेखितच झाले आहे. हे धरण पूर्ण भरल्याशिवाय स्वयंचलित दरवाजे खुले होत नसल्याने धरणातील साठा वाढेल, तसा टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्याची व्यवस्था वक्राकार दरवाजामुळे अस्तित्वात येणार आहे. सध्या प्रस्तावात आणि आराखडा यातच अडकून पडलेल्या प्रस्तावित योजनेचा "ड्रीप'मध्ये धरणाच्या समावेशाने मार्ग मोकळा झाला. "ड्रीप' योजनेतून जुन्या झालेल्या धरणात सुधारणा केली जाणार असल्याने प्रस्तावित योजनेसाठी भरीव आर्थिक निधीचा अडसरही दूर झाला आहे. 


"ड्रीप' योजनेत समावेश होणारे राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव धरण आहे. वक्राकार दरवाजांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जागतिक बॅंकेकडे जाईल. आगामी काळात प्रस्तावित योजना मार्गी लागेल. 
- खलील अन्सारी, कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ 

--

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com