
कोल्हापूर : अवकाळी, वळीव तसेच मॉन्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने शिल्लक राहिला आहे. राधानगरी धरणात गेल्यावर्षी १३ जून २०२४ रोजी एकूण पाणीसाठ्याच्या २४ टक्के पाणीसाठा होता आज तो ५२.७० टक्के शिल्लक राहिला आहे. हीच परिस्थिती इतर धरणांची व लघु पाटबंधाऱ्यांची आहे.