

Shahu Aghadi Sweeps Polls Under Yadravkar’s Leadership
esakal
Kolhapur Nagar Palika News : कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय पाटील -यड्रावकर यांनी विजय खेचून आणत सत्ता कायम राखली आहे. आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शाहू आघाडीने एकूण २५ पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळवला असून केवळ ५ जागांवर विरोधी गटाला समाधान मानावे लागले.