

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा होमपिच असणारा हा प्रभाग आहे. शेजारच्या प्रभाग क्र. ६ बरोबरच त्यांच्यासाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा राहणार आहे. साहजिकच, महाविकास आघाडीकडूनही येथे तगडे उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, कपीलतीर्थ मार्केटसह शहरातील जुन्या पेठांसह प्रमुख बाजारपेठांचा समावेश या प्रभागात आहे.