"तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा सचिवांनी समन्वय ठेवून पूरस्थिती नियंत्रणात आणली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा समन्वय नसल्याने महापुराचे संकट आले."
कोल्हापूर : आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढली म्हणजे कोल्हापूरला महापूर (Kolhapur Flood) येतो, असे म्हणता येणार नाही. यासाठी अन्य कारणेही आहेत, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.