कोल्हापूरच्या राजकारणावर महायुतीची पकड मजबूत झाली असून, पहिल्यांदाच एवढे मोठे यश मिळाले आहे.
कोल्हापूर : महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (ता. ५) होणार आहे. यामध्ये राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar), प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि विनय कोरे यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यांच्यापैकी पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागली आहे. मात्र, मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.