Shiv Sena UBT complaint against Rajesh Kshirsagar
esakal
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संदर्भातील व्हिडिओ हा ‘एआय’ नाही. तो खरा असून, त्यांनी यामध्ये एका व्यक्तीला धमकावले (Kolhapur political controversy today) आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून क्षीरसागरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले व महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला.