

Rajesh Patil Elected Gokul Chairman
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. निवडणूक निकालानंतर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर आज अध्यक्ष निवड पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदावर 16 विरुद्ध 13 मतांनी निवड झाली. तर समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मते मिळाली. निवडणुकीत समविचारी आघाडीने १३ तर महायुतीने १२ जागा जिंकल्या होत्या. पण गणपूर्ती अभावी अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला होता. मात्र शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर अध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडली. महायुतीकडून राजेश पाटील आणि समविचारी आघाडीने शशिकांत चुयेकर यांना उमेदवारी दिली होती.