
Rajesh Patil vs Hasan Mushrif : ‘चंदगड मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षनिष्ठा मानून काम करणारे आहेत. खैरात म्हणून पक्षाकडून त्यांनी काहीच मागितले अथवा घेतलेही नाही. राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांत जाहीर प्रवेशाद्वारे पक्ष जरूर वाढवा. पण, १९९९ मध्ये स्थापनेपासून पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्यांचा विसर पडू देऊ नका. चंदगडला न्याय देण्याची भूमिका कधी घेणार आहे की नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देण्याची भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी घ्यावी’, असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी आज केले.