नांदणी मठातील 'माधुरी' हत्तिणीसाठी पेटाच्या अधिकाऱ्यांनी २०२० साली माझी भेट घेतली होती. तसेच त्यावेळी नांदणी मठाला अंबानी समुहाकडून २ कोटी रुपयांची देणगी मिळवून देण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र, त्यावेळी आपण हा प्रस्ताव फेटाळून लावला. असेही त्यांनी सांगितलं. सोशल मीडिावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय राजू शेट्टी यांनी पेटाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे.