

Pune Bangalore Highway Traffic raju shetti kini toll naka
esakal
Sugarcane Price Demand : उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये द्यावी, अन्यथा मुंबईकडे जाणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊसदराच्या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा आज (ता. ४) दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांनी रात्रभर महामार्गावर ठिय्या मांडल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.