

Pune Bangalore Highway Traffic
esakal
Raju Shetti Protest : उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. ३) किणी टोलनाक्यावर बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी टोलनाका बंद पाडत महामार्गावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.