

Raju Shetti Shaktipeeth highway statement
esakal
Shaktipeeth highway protest Kolhapur : ‘कोल्हापूरची जनता शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडेल आणि हे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून सत्ताधारी या प्रकल्पातून ६५ हजार कोटी रुपये कमावून २०२९ च्या निवडणुकीची बेगमी करत आहेत. वेळप्रसंगी रक्त सांडू; पण शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपल्या जमिनीची मोजणी होऊ देऊ नये’, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.