Kolhapur Rankala: निधीचा पाऊस, पण रंकाळ्यात प्रदूषणाचा पूर दहा वर्षांत ३८ कोटी खर्चूनही सुशोभीकरण कुठेच दिसत नाही!
Rankala redevelopment: दहा वर्षांत ३८ कोटींचा निधी मंजूर, तरी रंकाळा तलावाची दुरवस्था कायम टॉवर, भिंती आणि उद्यानांची जीर्ण अवस्था नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.
कोल्हापूर: शहरात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरण, संवर्धनासाठी दहा वर्षांत ३८ कोटींवर निधी मंजूर झाला. त्यातून विद्युत रोषणाई सोडल्यास तलावाची स्थिती बदलल्याचे दिसत नाही.