
सर्व्हर डाउनमुळे थांबले धान्य वाटप, ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ
esakal
Diwali Ration Distribution Problem : सर्व्हर डाउन झाल्यामुळे बुधवार (ता. १५) पासून शहरातील बहुतांश रास्त भाव धान्य दुकानातील धान्यपुरवठा थांबला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांना धान्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. पुरवठा विभागातील रेशनकार्डमधील दुरुस्तीची कामेही रखडली आहेत.