Maharashtra highway project farmer compensation
esakal
कोल्हापूर
Maharashtra Highway Land Acquisition: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत राजपत्र जारी, शेतकऱ्यांना चारपट मोबदला
Farmers Compensation Maharashtra : रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत राजपत्र जारी झाले असून शेतकऱ्यांना चार पट दराने मोबदला मिळणार आहे.
Ratnagiri Nagpur National Highway : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील किलोमीटर १४५ ते किलोमीटर १८१ या अंकली ते चोकाक दरम्यान रस्तेकामासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ गावांतून हा महामार्ग जाणार असून, अधिग्रहण केल्या जाणाऱ्या जमिनीला सरकारने रेडिरेकनरच्या चौपट दर देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध संपला असून, आता रस्ता उभारणीची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

