
Kolhapur Politics : ड्रेनेज घोटाळ्याबाबत महापालिकेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह ७० ते ८० जणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाआधी खरी कॉर्नर ते महानगरपालिका या मार्गावर ही रॅली काढल्याने वाहतूक विस्कळीत बनली होती.