कोल्हापूर : रेशन कार्ड अपडेटसाठी असलेल्या आरसीएमएस सिस्टीमचा सर्व्हर डाउन असल्यामुळे दुरुस्ती गेली तीन दिवस बंद आहे. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे अनेकांना अपडेट रेशनकार्डची आवश्यकता आहे. मात्र सर्व्हर डाउन असल्यामुळे ही दुरुस्ती करणे अशक्य होत आहे. यामुळे रेशनकार्डधारकांतून असंतोष व्यक्त होत आहे.