esakal | सावधान ; कॉफी शॉपमध्ये जाताय... होईल ही कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

read on coffee shop in kolhapur ichalkaranji

चार ठिकाणांहून २१ प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. यामध्ये एक विवाहित जोडप्याचाही समावेश आहे. या प्रकरणी चार कॉफी शॉपचालक व जागा मालकांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. बिरादार यांनी सांगितले.

सावधान ; कॉफी शॉपमध्ये जाताय... होईल ही कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) - शहरातील विविध सात कॉफी शॉपवर आज दुपारी पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी छापे टाकले. यातील चार ठिकाणांहून २१ प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. यामध्ये एक विवाहित जोडप्याचाही समावेश आहे. या प्रकरणी चार कॉफी शॉपचालक व जागा मालकांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. बिरादार यांनी सांगितले.

हे पण वाचा - Womens Day खबरदार..! छेडछाड कराल तर... 

शहरातील कॉफी शॉपमध्‍ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत आज पोलिस उपअधीक्षक बिरादार यांनी स्वतः एका पथकासह झेंडा चौक, सांगली रोड, महासत्ता चौक आदी परिसरातील कॉफी शॉपवर छापे टाकले. यामध्ये २१ तरुण - तरुणींना ताब्यात घेतले. यामध्ये एक विवाहित जोडप्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही विवाहिता मुलाला पालिकेच्या बागेत खेळण्यासाठी सोडून कॉफी शॉपमध्ये आली होती.  ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींवर कारवाई करून सोडून दिले. यातील तीन अल्पवयीन मुलींना नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

हे पण वाचा - होय; इथं मुलं शेकड्यात पुस्तकं वाचतात...

या चालकांवर गुन्हे दाखल
  श्रीहरी कॉफी (सांगली रोड) प्रमोद पाटील (जागा मालक बाळगोंडा पाटील)

  ओम साई कॉफी (सेवा भारती जवळ) अरुण पुजारी (जागा मालक ओंकार शेलार)

 अंडरग्राऊंड कॉफी (महासत्ता चौक) अभिषेक पाटील (जागा मालक प्रकाश केस्ती) 

रेस्टो कॉफी (झेंडा चौक), सपना भिसे (उमाजी जगताप) 
कॉफी शॉपमध्ये फक्त टेबल व खुर्च्या अशी व्यवस्था असावी. गैरप्रकार करण्याच्या हेतूने चुकीच्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था करण्यात आली असेल तर कॉफी शॉप चालक व जागा मालक यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- गणेश बिरादार, पोलिस उपअधीक्षक

loading image
go to top