
कुडित्रे: कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे बांबूने भरलेल्या ट्रकला मागून दुचाकीस्वाराने धडक दिली, यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. सचिन सुनील मिरजकर (वय २१) व राज हिंदुराव बेंद्रे (वय २१, दोघे रा. खुपिरे) अशी जखमींची नावे आहेत. रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.