
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : शहराचा वाढता आकार, ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या यामुळे सांडपाण्याचे प्रमाणही वाढत आहे. सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया होत नसल्याने पंचगंगा नदीबरोबरच स्थानिक जलस्त्रोतही प्रदूषित होत आहेत. खुल्या जागेत सोडलेल्या सांडपाण्याचा सर्वात मोठा धोका भूगर्भातील जलसाठ्याला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे.