Kolhapur : 'रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवा : शैलश बलकवडे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

'रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवा : शैलश बलकवडे'

कोल्हापूर : ऊस वाहतूक वाहनांना तातडीने रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलश बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. ऑक्टोबपासून साखर कारखाने सुरू झाले. ऊस वाहतूक प्रामुख्याने ट्रक्टर ट्रॉली, ट्रकमधून केली जाते. यातील अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्गावर अपघाताचे धोके वाढले आहेत. याबाबत ‘सकाळ’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक बलकवडे यांनी आढावा बैठक बोलवली होती. यामध्ये बलकवडे यांनी रिफ्लेक्टरविना ऊस वाहतुकीकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच अनेक चालक मोठ्याने स्पिकर लावून वाहने चालवतात अशा तक्रारी येत आहेत.

गेल्या काही दिवसात महामार्गावर ऊस वाहतूक वाहनांचे सात गंभीर अपघात झाले आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी हद्दीत ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम तातडीने हाती घ्या. साखर कारखान्यांबरोबर रिफ्लेक्टर संबधी पत्रव्यवहार करावा अशा सूचना केल्या. दरम्यान, छत्रपती राजाराम कारखान्याला शहर वाहतूक शाखेने भेट दिली. येथील संचालक, कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. वाहतूक नियमांच्या पालनाबाबत चालकांचे प्रबोधन केले. वाहनांना कापडी रिप्लेक्टर लावले. त्याचबरोबर रिफ्लेक्टर नसलेल्या सहा वाहनांवर, मोठ्याने टेप रेकॉर्ड (साऊंड सिस्टीम) लावल्याबद्दल दोन चालकांववर, परवाना न बाळगणाऱ्या पाच जणांवर तर नंबर प्लेट नसलेल्या एका वाहनांवर कारवाई केली.

loading image
go to top