
नूसिंहवाडी (कोल्हापूर) - मुसळधार पावसामुळे वाढत जाणाऱ्या महापुराच्या हाहाकारामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. अशातच वाढलेल्या पाण्यामुळे आज काही शेतकरी आपल्या तरफावरील मोटर काढण्यासाठी नदीपात्रामध्ये उत्तरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे व अचानक तुटलेल्या मोटारीच्या दोरीमुळे काही किलोमीटरचा प्रवास तरुणांना करावा लागला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून महापुराच्या पाण्यातून धोक्याचा प्रवास करूनसुद्धा तरुणांचा जीव वाचला.
पावसाबरोबर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. आज सकाळी अकरा वाजता गणेशवाडी येथील दीपक वास्कर, महेश कदम, राहूल गौरवाडे, उत्कर्ष खोत, वैभव वास्कर, हे पाच तरूण शेतातील तरफयावर असलेली मोटर काढण्यासाठी गेले होते. तरफयाला बांधलेली दोरी अचानक तुटल्याने त्याच्यावर असणारे तरूण ही पाण्याबरोबर वाहू लागले. कृष्णा नदिच्या पाण्याला प्रवाह असल्याने ते प्रवाहा बरोबर तब्बल 8 कि. मी. वाहत गेले. त्यावेळी त्यांनी मोबाईल वरून याबाबत ग्रामस्थांना महिती दिली.
तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ यांना ही महिती कळाल्यानंतर वजीर रेकसू फोर्सच्या जवानांना ताबडतोब रेस्क्यू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वजीर रेकसू फोर्सचे रौफ पटेल, औरवाडचे माजी उपसरपंच दादेपाशा पटेल यांनी टीमसह यांत्रिक बोटीतून तातडीने जावून या शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. तरफयावरून वाहत येणाऱ्या तरूणांना प्रवाहात थांबून दोरीच्या साह्याने बोटीत घेण्यात आले. गौरवाड येथील पाणवठ्यावर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. वेळेचा प्रसंग बघता वजीर रेकसू फोर्सच्या जवानांनी तातडीने हालचाल करून पाच तरूणांचे जीव वाचविले.
हे पण वाचा - मोठी बातमी; कोल्हापूरमध्ये होणार मूसळधार पाऊस
या रेस्क्यूमध्ये औरवाडचे माजी उपसरपंच दादेपाशा पटेल, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. हाके, अल्ताफ पटेल, तोहिद मुल्ला, मुझमिल पटेल यांच्यासह गामस्थांचा सहभाग होता.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.