
कोल्हापूर : ‘काही लोक मंत्री झाले की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांचा तोरा वाढला आहे. हे मंत्री जहागीरदारासारखे वागत आहेत. आपल्याच मतदारसंघातील कामातून मंत्र्यांना डोके वर काढायला वेळ नाही. मंत्री हे राज्याचे नव्हे तर त्यांच्या मतदारसंघाचे मंत्री झाले आहेत. यातून मंत्री व सरकारमधील बेबनाव समोर येत असल्याचा घरचा आहेर आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.