
-गौरव डोंगरे
कोल्हापूर : शस्त्र िक्रयांमध्ये भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा थेट नशेसाठीच वापर होऊ लागल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ‘मेफेनटेरामाईन’ या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. व्यायामशाळेतील मुलांना इंजेक्शन विकणाऱ्या अमोल पाटीलला २२ जूनला अटक करण्यात आली होती. तर आता एका गांजा विकणाऱ्याकडे हे घातक इंजेक्शन मिळाले असून सांगलीतून त्यांची खरेदी होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.