Rickshaw Fare Hike : रिक्षा प्रवास महागला: उद्यापासून अंमल; किमान भाडे दर तीन रुपये वाढले
Kolhapur News : किमान भाडेदराच्या पंचवीस टक्के, तर ग्रामीण भागासाठी याच वेळेतील भाडे वाढ चाळीस टक्के असणार आहे. प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी ६० बाय ४० सेंटीमीटरच्या आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी तीन रुपये शुल्क असणार आहे.
"Starting tomorrow, passengers will face an increase in rickshaw fares as the minimum fare rises by three rupees in Mumbai.Sakal
कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्षेत्रासाठी तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी एक मार्चपासून भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. सध्याचा किमान भाडे दर बावीस रुपये असून, सुधारित दर पंचवीस रुपये होईल.