

खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?
esakal
IMD Alert Arabian Sea : गेले दोन दिवस किनारपट्टीवर जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. मत्स्य आणि बंदर विभागाकडून मच्छीमार तसेच सागरी पर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. खराब समुद्री हवामानामुळे सलग चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद होती. दरम्यान, वादळी हवामानाचा मासेमारी आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.