
Royal Dussehra Kolhapur
esakal
महोत्सवासाठी भविष्यात निधी उपलब्ध होईल
दरवर्षी राज्याचा सांस्कृतिक व पर्यटन विभाग महोत्सवात सहभागी होणार
राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम या महोत्सवात होणार
विविध राज्यांच्या कलाकारांचे कलादर्शन होणार
Kolhapur Tourism News : पौराणिक आणि ऐतिहासिक वारशाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार या महोत्सवाची राज्य पर्यटन विभागाच्या दिनदर्शिकेत प्रमुख पर्यटन महोत्सव (सन २०२५-२६) अशी नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. या शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जातो. म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणेच हा शाही महोत्सव लोकप्रिय होत आहे.